STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

मनःशांती...!

मनःशांती...!

1 min
312


कोणी म्हणेल चित्र पाहुनी

हाव किती मोठी

गोष्ट इतकी छोटी

हवी नुसती रोटी...


रोटीचे मोल बाबा

रिकाम पोटी जाणे

त्यालाच ठावे सारे

काय जीवनात उणे...


हाव धरुनी सौख्याची

धावत जाई

आत्मघातच स्वतःचा

एक तुकड्या पायी करून घेई...


पण हवी असेल तर

खरी मनःशांती

हाव सोडुनी सौख्याची

जरा डोकावून पाहावे चित्ती....


मृगजळाचे मागे धावून

तृषा शांत होत नाही

सौख्या पाठी लागता

पदरी सौख्य पडत नाही...


निराशा अंतरी जडता

अंत झाक्यावचून रहात नाही

सौख्याचे तसेच आहे

पाठी लागत ते गवसत नाही...


हिरवा पाला पाहून

मान कापण्यास कधी न द्यावी

त्या पेक्षा कष्टाची भाकरी

घाम गाळुनी सुखाने खावी....!



साहित्याला गुण द्या
लॉग इन