मनास मी समजवते"
मनास मी समजवते"
मन माझे भिरभिरते
तुझ्या ह्रदयात फडफडते
मनास मी समजवते
जीवानिशी उडान भरते...
मज लव्हाळी दिसली
कमालीने तिला तोडले
शब्द ओठीचे मुक्त झाले
आतले फुल आनंदले..
मनास भावली तूच
जगी नव्हाळीचा आभास
सांगू किती पापण्यांना
नको सुकवू तू अश्कास..
गुलाबी हवा ही खास
तुझा सोबतीला सहवास
आयुष्य वाहले तुला
रंगला संगतीला प्रवास..
जातीचे रंग अनेक
गड किल्ले ही पडले गहान
कडवट सुखाचा आभास
देशाला म्हणावे महान..
दुवा होती विकायला दूकानात
कैकांनी घेतली उधार
द्याया कोणीच आले नाही
आली बाजार भावात मार..
