Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pratibha Bilgi

Others

5.0  

Pratibha Bilgi

Others

मनांची नाती

मनांची नाती

1 min
323


प्रित आपुली जगावेगळी ,

जुळली दोन मनांची नाती .

काही न सांगता कधी - कधी ,

तू सर्व काही घेती समजूनी .


मनांची नाती असतात ,

नेहमीच आगळी - वेगळी .

जो - तो बनवी नवी हमेशा

व्याख्या या सुंदर प्रेमाची !


विचार भिन्न असले तरीही ,

त्यांना प्रेमात जागा नाही .

प्रेम म्हणजे प्रेमच होय ,

त्याला दुसरा पर्याय नाही .


प्रेमात मरून जाणे , हा प्रेमाचा

मी म्हणेन अपमान आहे .

जर नाही मिळाले प्रेम ,

तर त्यातच जळण्यात मजा आहे .


सगळ्यांनाच मिळते प्रेम ,

हा निव्वळ समज आहे .

ज्याला मिळाले खरे प्रेम ,

तोच खरा नशिबवान आहे !


Rate this content
Log in