मनाच्या वेदना
मनाच्या वेदना
1 min
449
कधीकधी मला एक प्रश्न पडतो
मनाला वेदना झाल्या की
डोळ्यात अश्रू येतात
जर डोळ्यात अश्रूच नसतील तर
दुःख काय असतं ते कळलंच नसतं
दुःख कळलं नसतं तर
मनाला कसलीच किंमत उरली नसती
जर किंमत उरली नसती तर
मनाच्या इच्छा पूर्ण कशा केल्या असत्या
जर आपल्या मनात इच्छा नसती तर
परमेश्वरासमोर कोणी नतमस्तक झाले नसते
खरंच हा आयुष्याचा खेळ
अजूनही कोणाला कळला नाहीये
