मनाची श्रीमंती
मनाची श्रीमंती
1 min
849
शोध मानवा तू
मनातली श्रीमंती
श्रीमंतीचा थाट जरी
पक्वान्नाचे ताट जरी
भुकेला येतो दारी
जेवू घाल पोटभरी
शोध मानवा तू मनातली श्रीमंती ..
राजा जरी महालाचा
रत्नजडित सोन्याचा
ठेवी मान चाकराचा
कष्टकऱ्या झोपडीचा
शोध मानवा तू मनातली श्रीमंती
अनाथास साथ देसी
बूडत्यास हात देसी
जाण ठेव उपकाराची
हो काठी मायबापाची
शोध मानवा तू मनातली श्रीमंती