मनाची कवाडे
मनाची कवाडे
1 min
447
मनाला म्हणालो
थोडा विचार कर ना रे ।
जग बदलतय सगळं
तू थोडं बदल ना रे।।
मनाची कवाडे
आता तरी खोल ना रे ।
जगात काय सुरू आहे
बाहेर निघून बघ ना रे।।
हिम्मत करून
पाऊल पुढे टाक ना रे।
स्वतःसाठी थोडा वेळ
कधीतरी देऊन बघ ना रे।।