मनाची भाषा....
मनाची भाषा....
1 min
304
मनाची भाषा
समजते अंतरात्म्याला,
समजून घ्या
मनाच्या अंतरंगाला...
मनाची भाषा
नजरेतूनही कळते,
संदेहातून मन
संदेश तसा कळवते...
मनाची भाषा
व्हावी लागते एकरूप,
तेव्हाच तिचे कळते
मनातील स्वरूप...
