मनाचे सौंदर्य
मनाचे सौंदर्य
1 min
149
जपून ठेव मनाचे सौंदर्य
नको पडून देऊस डाग
नावे कशास ठेवतील सारे
आपुलकीने सार्यांशी वाग
आचरणात आण सद्विचार
मनात साठवू नकोस कचरा
विचारांची वाढवत उंची
सदैव होवू दे त्याचा निचरा
नको ठेवूस राग मनात
होरपळून जाई कोवळे मन
विस्कटलेली घडी बसणे
होईल पुन्हा गहन