STORYMIRROR

Varsha Chopdar

Others

3  

Varsha Chopdar

Others

मनाचे दार

मनाचे दार

1 min
511


विषय - मनाचे दार



चेतन अचेतन

मनाचे रे प्रकार

करूनी विचार

आचरणावे



अचेतन मन

असे शरीराचा निर्माता

होई विधाता

जीवनाचा



चांगला विचार

मनी देऊ आकार

होईल साकार

ध्येयपूर्ती



अचेतन मन

आहे स्मृतीचे भांडार

मनाचे दार

उघडूनिया



रचले काव्य

जागृत कराया लोक

मनाचे श्लोक

रामदासांनी


Rate this content
Log in