मनाचा प्रवास
मनाचा प्रवास
1 min
225
वेड्या भरकटणाऱ्या मना
काही केल्या उमगत नाही
कुणी आपले जगात नाही
खुळे मन काही जाणे काही
मला कळेना प्रवास काही
भेटे कोणी ह्या प्रवासा वरी
चार दिसांची सोबत ठेवी
स्वार्थ साधला निघुनी जाई
झाडावरी पान सुकलेले
पक्षी बघा हे उडूनी गेले
शून्यामध्ये नजर लाविते
काय दिसे हे ईश्वरी ठावे
विटा दगडांनी घर बांधे
नाते माझे ते होते वेगळे
इथे अनुभवले प्रसंग
सुखं दुःखाचे कैक सोहळे
जन्म झाला तेव्हा मी रडले
अंत क्षणी का? पुन्हा आसवे
दोन्ही घटनांच्या अंतरास
नाव त्यास जीवन असावे
