मन
मन
1 min
334
खूप काळजी वाटते
मनात असते जेंव्हा भय
त्याच त्याच विचारांची
मनात सलत असते सय
विचारांची साखळी थांबते
सुरू होतो एकच विचार
मन कुठे ही रमत नाही
आळशी बनून होतो बेकार
जगात देव आहे का ?
हा जसा प्रश्नचिन्ह आहे
जगात भूत आहे का ?
हा ही एक प्रश्नच आहे
मनातला विचार काढून
चारचौघात उठला बसला
मन ही रमते गमते तिथे
भय वाटत नाही मनाला
