मन वढाय वढाय
मन वढाय वढाय
1 min
244
इथे देहाच्या मंदिरी
वसे आत्मा निरंतर
मन वढाय वढाय
चित्तचोर तो चकोर
चित्तशुद्धी साठी जरी
देह भजनात रंगे
भिरभिरे इथे तिथे
मन कुणाच्या हो संगे?
मूर्ती देवाची पाहता
जडे मनामध्ये भक्ती
मन राहिले घरात
इथे सुटेना आसक्ती
प्रश्न कठीण पडता
कोडे बुद्धीला ते पडे
शीण डोक्याचा घालवी
मन जरी जवापाडे
जग अथांग सागर
त्यात डोह किती तरी
परी मनाची उमेद
नेई कशी पैलतीरी
मन वढाय वढाय
त्रस्त बुद्धिरुपी फौजी
सोडुनिया सारे आता
मी ही झाले मनमौजी
