मन हे बावरे
मन हे बावरे
दिवस संपत आला पण माझं मन का बावर होतं प्रेमाच्या वाटेवरती एकदम सुन्न झालं
सगळं कळत असूनही उदास वाटत आहे
खरंच मन माझं कावराबावरा होत आहे
माझ्या भाबड्या मनात प्रश्नांची धडपड होतेय
उत्तर काही मिळत नव्हते डोळ्यासमोर प्रश्नचिन्ह उभे होते
प्रेमाच्या ओंजळीत अपेक्षांचे फुल साचले होते ओंजळीत माझ्या मात्रा एक पाकळी सूकलेली होती
त्या ओंजळीतल्या पाकळीला आसवांची दाटी होती रडत होते ते पणा आसव तिचे सुकलेले होते
समजून तू घेशील तिला बा मनाला
हळूच चुंबन घेशील त्या ओल्या पापणीला
तिला कळते तुझी अवस्था रुतलेल्या त्या मनाची शब्दाविना कळेल का अर्थ त्या स्पर्शिती गांधनाची
शेवटी मन हे मनच असता कसा आवरू मी
ह्या माझ्या देहाला माझ्या मनाला
