ममता
ममता
1 min
210
तिची ममता आहे अबोल
तिची क्षमता आहे अनमोल
तिचं भाबड मन अखंडित
प्रेमळ मन मुलांना घडवीत
तिचा व्याकूळ जीव पाण्यातला
मनाच्या तारांनी आसमंत भिडलेला
तिला आहे तिचं अस्तित्व
त्यातच हरवलं तिचं स्वत्व
तिचा पाझर आहे मायेचा
तिचा प्रवास आहे त्यातच परतण्याचा
