मम्मीला सुट्टी देऊया
मम्मीला सुट्टी देऊया
चल आज हॉटेल मध्ये
जेवायला जाऊ या
आज तूझ्या मम्मीला
सुटी देऊया || 0 ||
रोज रोज जेवण बनवून
थकते बिचारी
सोसते त्रास सर्व
कुणा काय विचारी
चल आज हॉटेल चे
पदार्थ खाऊया
आज तूझ्या मम्मीला
सुटी देऊया || 1 ||
मम्मीला ही एक दिवस
आराम हवा
आपण सर्व चाखूया
पदार्थ नवा
कोल्ड ड्रिंक आणि
मिल्क शेक पिऊया
आज तूझ्या मम्मीला
सुट्टी देऊया || 2 ||
वर्षाचे बारा महिने
सतत काम करी
जॉबलाच असते जणू
असून ती घरी
मम्मीसाठी आपण तूझ्या
आराम विकत घेऊया
आज तूझ्या मम्मीला
सुट्टी देऊया || 3 ||
आज चल ट्राय करू
चायनीज डिशेस
नॉनव्हेज हॉटेल मध्ये
खाऊया फिशेस
त्यांनतर ट्राय करू
चायनीज सेवया
आज तूझ्या मम्मीला
सुट्टी देऊया || 4 ||
सतत आपण ऑर्डर करतो
काय खायला हवे
आपल्यासाठी शिकते ती
पदार्थ नवे
हफ्त्यातून एकदा
हॉटेल मध्ये जेवूया
आज तूझ्या मम्मीला
सुट्टी देऊया || 5 ||
