STORYMIRROR

Suchita Kulkarni

Others

3  

Suchita Kulkarni

Others

मकरंद

मकरंद

1 min
487

मधमाशी करी ।। मकरंद गोळा

आनंद सोहळा ।। नित्य गोड


संचय मधाचा ।। प्रेमळ सागर

मधाचा आगर।। खूप मोठा


एक एक कण।। करी नित्य साठा

जीवा आटापिटा।। करी सदा


सुख जीवनाचे ।। कसे शोधतेस

नित्य राहतेस ।। कामामध्ये


मार्ग हा काटेरी ।। सुख मानूनिया

उद्योगी राहाया।। जीवनात


भारी संघटन।। नित्यची साधना

प्रेम आराधना करीतसे


साहित्याला गुण द्या
लॉग इन