STORYMIRROR

Varsha Chopdar

Others

4  

Varsha Chopdar

Others

मित्र

मित्र

1 min
384

घरातील व्यक्तींच्या व्यतिरिक्त 

भेटल्या अनेक व्यक्ती 

चित्र विचित्र असतात 

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती 


त्यात एखादा असा भेटतो

जिव्हाळ्याचा विषय होतो

इकडे तिकडे सगळीकडे 

फक्त तोच हवा असतो


मित्र, सखा, सोबती 

अशी विविध रूपे त्याची 

चला आता आपण

महती पाहू याची 


सुख असो वा दु:ख  

साथ कधी सोडत नसतो

बघता क्षणी मनातले ओळखतो 

आत्मविश्वासाचा प्रश्नच नसतो


सुदामा - कृष्णा, जय आणि वीरू

यांची जोडी आपण कशी विसरू

एक से भले दो, दो से भले तीन

दोस्ती वाढवून दुनियादारी करू


Rate this content
Log in