STORYMIRROR

Vishakha Gavhande

Others

3  

Vishakha Gavhande

Others

मित्र पाहिजे असा

मित्र पाहिजे असा

1 min
11.6K

मित्र पाहिजे असा

कधी कधी तिढ्यात

कधी कधी कोड्यात

तर कधी गोडीत बोलणारा


मित्र पाहिजे असा

कधी सुख वाटणारा...

कधी दु:ख वाटणारा...

कधी समजून घेणारा...

तर कधी समजावून सांगणारा...


मित्र पाहिजे असा....

कधी आपलंस करणारा

कधी अश्रु पुसणारा

तर कधी कधी हक्काने ओरडणारा..


मित्र पाहिजे असा

नेहमी मन जाणणारा...

सतत ह्रदयात बसणारा

तर कधी गालातल्या गालात हसणारा..


मित्र पाहिजे असा

योग्य ती वाट दाखवणारा

तर कधी कौतुकाने पाहणारा

संकटात हात देणारा...


मित्र पाहिजे असा..

ओठावर हसु आणणारा

कधी डोळे वटारणारा

चुकलं तर कान धरणारा...


मित्र पाहिजे असा...

जीवाला जीव देणारा..

कधी भाव खाणारा

तर कधी भाव देणारा...


मित्र पाहिजे असा...

कधी तिखट बोलणारा...

कधी तिखट वागणारा..

कधी गोडी लावणारा...


मित्र पाहिजे असा...

मंजुळ पाव्यासारखा

दुधाच्या खव्यासारखा...

आणि

आयुष्यभर साथ देणारा ,...


Rate this content
Log in