STORYMIRROR

Manisha Wandhare

Others

2  

Manisha Wandhare

Others

मी विझणार नाही...

मी विझणार नाही...

1 min
72

गरुडासम मला उडता येत नाही ,

चिमणी म्हणे मी उडणे सोडणार नाही ...

स्वप्न माझे असे हे असेल दुसऱ्यांचेही ,

ते पूर्ण करणार म्हणून मी हरणार नाही ...

माणसाने माणसाला कधी केव्हा ओळखले ,

मागे खेचणार म्हणून मी मागे राहणार नाही ...

कुठेतरी स्वप्नांना डोळ्यांची काजळी चढली ,

दूर करेल काजळीला... मी विझणार नाही ...

आहेत बहु लिहिणारे थोरही होऊन गेले ,

छंद माझा माझ्यापरी मी लिहिणे सोडणार नाही...

आकाशाची निरभ्रता वाटे भरावी मनातही ,

भरारी घेईल मनातुनी जरी पंखाने उडणार नाही ...


Rate this content
Log in