STORYMIRROR

Vinita Kadam

Others

4  

Vinita Kadam

Others

मी व माझे स्वयंपाकघर

मी व माझे स्वयंपाकघर

1 min
305


👌मी व माझे स्वयंपाकघर👌


माझ्यासाठी स्वयंपाकघर

आहे माझे हृदयमंदिर

प्रेमळ नातं जोडायला

कायमच असतं फायदेशीर ||१||


ऐकत आले आजवर

आनंदी मार्ग जातो पोटातून

पण घराच्या सौख्याचा मार्ग

जातो स्वयंपाक घरातून ||२||


लाॅकडाऊनची आहे सुट्टी

पुरवी घरच्यांच्या मनाची आस

रोज नवनवीन फर्माइश

बनवत राहते काही खास ||३||


इडली-सांभर , उतप्पा

कधी भारतीय पास्ता

सर्वांच्या आवडी पुरवण्यात

मी खाते जास्तच खस्ता ||४||


कधी पोहे ,शिरा, उपमा

कधी भेळ चटपटीत

शेजारी डोकावून पाहतात

बेत काय चमचमीत ? ||५||


लहानांपासून वृद्धांपर्यंत

पदार्थांची असते रेलचेल

अनेक रुचकर व्यंजनांचा

ताटात होई सुगंधी मेळ ||६||


पातेलं-पळी , कढई-झारा 

परस्परांशी घाली संवाद

जेवण तयार झाल्याची

कुकरची शिट्टी घाली साद ||७||


आंबेमोहोर तांदळाचा

घमघमाट खिचडीचा

गरम चपाती , तूप कडवल्याचा

दणदणीत दरवळ फोडणीचा ||८||


सणासुदीला माझे स्वयंपाकघर

पदरी खोचून सज्ज राही

खीर-पुरी , पुरणपोळी

पंचपक्वान्न सोबत राही ||९||


स्वच्छ माझ्या स्वयंपाकघरात

अन्नपूर्णा राहते प्रसन्न

कौटुंबिक सुख, समाधान मिळेल

जर खाल तुम्ही असे अन्न ||१०||


Rate this content
Log in