STORYMIRROR

swati Balurkar " sakhi "

Others

3  

swati Balurkar " sakhi "

Others

मी तुलाच स्मरले होते!

मी तुलाच स्मरले होते!

1 min
243

दिशाहीन मी जगले, अडखळत चालले होते,

तुझ्यामुळेच तर मी, आयुष्यात बहरले होते


मीच कमनशिबी हाती ना माझ्या, तुझ्या सोबतीची रेषा,

तळहाती नाव लिहून तुझे अर्ध्यात सोडले होते 


ओलेत्यात पाहुन मला, नियत न ढळली तुझी

संयमाच्या चौकटीवर मी तुझ्या प्रेमात पडले होते


सावरणे ते स्वतःला तुझे, नेहमीच पाहत आले

बर्फाचे होऊन पाणी मी मनात वितळले होते


श्वासात माझ्या विरुनी, रक्तासम फिरला होता

हरवलेले आयुष्य तुझे, माझ्या गाली रंगले होते


नकार तुला न दिला मी, चौकट आखली नाही,

पण निघून जातानाही पाऊल माघारी वळले होते


खिडकीत कातरवेळी, एकटी हरवते जेव्हा

डोळ्यांतून गालावरती मी तुलाच पुसले होते


भानावर येते पुन्हा अन् पदराने पुसते अश्रू 

तू पदरी पडता माझ्या, मी दडवून ठेवले होते


आयुष्यात जरी नसले, तुझ्या मी आताशा

एकांताच्या हरेक क्षणी मी, तुलाच स्मरले होते


Rate this content
Log in