मी तरूण आहे.
मी तरूण आहे.
जीवन माझे चिखलात किती फसून आहे
शोकाकुल ती अश्रू नयनी भरून आहे..!!
या आभाळी काळसर निळे रंग दाटले
मेघांचे ही भाव वेगळे सरून आहे..!!
घाव मनाचे घाबरतो बघ ,येण्यासाठी
मी आताशी, त्याला पुरता, उरून आहे..!!
सुसाट वारा, उभा ठाकतो खेटुन माटुन
प्राणपणाने दारी माझ्या बसून आहे..!!
काटेरी झुडपातूनी मी वाट काढली
त्यावाटेवर दगडी धोंडे रुसून आहे....!!
नव्या युगाची, नवी बासरी ,वाजवून तू
ऐक झर्याचे खळखळणे ते हसून आहे..!!
प्राशले कधी आत आतल्या जहर दुखाचे
स्वत:ला आज ठेवलेत मी तरूण आहे..!!
