मी स्त्री आहे
मी स्त्री आहे
1 min
318
मी स्त्री आहे माझा काय गुन्हा आहे
मनातली माणुसकी संपली हो
पोटच्या जन्मदत्रीला नराधम सोडत नाही
माझा काय गुन्हा की मी स्त्री आहे
माझं शरीर मलाच श्राप ठरतंय
नराधमाच्या जबड्यातून मिच मला सोडवते
अवस्था माझी बघून जागे झाले नराधम
लचके तोडण्यास तयार झाले नराधम
माझा काय गुन्हा की मी स्त्री आहे
ह्या नराधमाच्या जबड्यातून कशी सुटका करून घेऊ
विध्वंसक नजरेचा नेहमी मी शिकार होत असे
त्यावेळी त्यांना का नाही जाणवत की
मी कोणाची बायको, बहीण आहे, आई आहे,
सांग राजेहो, माझा काय गुन्हा आहे की मी स्त्री आहे
