मी ना उरलो
मी ना उरलो
1 min
181
विसरून सारे जग
मी एकटाच चाललो
स्मरणात काहीच नाही
माझ्यात मी ना उरलो
सोडून गेले सारे स्वकीय
जगी एकटाच उरलो
आठवते काहीच नाही
माझ्यात मी ना उरलो
प्रत्येक क्षण आठवणीत
आसवे गाळीत बसलो
भान कुठलेच नाही
माझ्यात मी ना उरलो
सवय झाली मला असे
एकटाच जगत राहिलो
सोबतीला कोणी नाही
माझ्यात मी ना उरलो
