मी कोण
मी कोण
1 min
243
माझ्या लेखाचे सर्वदूर
चाहते झाले होते
माझ्या कलेला आज
मीच न्याहाळत होतो
जवळ असून ही
कळत नव्हते मला
माझ्या कवितेला
मीच शोधत होतो
मला विश्वास बसेना
मी हे करू शकतो
माझ्या प्रतिभेला
मीच पाहत होतो
कळलेच नाही मला
मी कोण आहे ?
माझ्या आविष्कारासाठी
जीवनभर हुडकत होतो.
स्वतः मधला मी जो
ओळखतो लवकारी
समाधानी जीवन जगत
राहतो आनंदी तो
