STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Others

2  

Asmita prashant Pushpanjali

Others

मी कायम तुझ्याच सोबत आहे.

मी कायम तुझ्याच सोबत आहे.

1 min
1.1K

हे बघ, तु लांब जरी असलास,

तरी मी कायम तुझ्याच सोबत आहे।

अश्रू पुस डोळ्यातील,

तुझ्या डोळ्यातील पाण्यात मी वाहत आहे.


जरा सांभाळून,

भरधाव नको चालवूस वाहन,

गाडीलीत चाकात नाही,

तुझ्या पायातील गतीत मी चालत आहे.


बघ ना जरा,

कपाटातील त्या पुस्तकांमधे

वाच जरा ओळ नी ओळ,

 प्रत्येक अक्षरात मी रेखाटली आहे.


तुझ्या आवडत्या भाजीसह,

प्रत्येक त्या व्यंजनात,

व घडत असलेल्या,

उपवासातही मी आहे.


तुझ्या आवडत्या त्या,

कथ्थइ रंगाच्या,

पोशाखातील रेषोन रेषा मधे ही,

मी सामावली आहे.


तु लिहीतोस, त्या डायरीतील,

प्रत्येक शब्दात , मी आहे.

हस रे तू खळखळून,

तुझ्या त्या टहटह्यात मी हसत आहे.


कुठे कुठे सापडू तुला,

तुझ्या चल अचल, प्रत्येक कृतीत,

अरे मी तर कणोन कणात,

तुझ्यात एकरूप झाली आहे.


हे बघ, तु लांब जरी असलास।

तरी मी कायम तुझ्याच सोबत आहे.


Rate this content
Log in