मी अशी आहे
मी अशी आहे
स्वतःच्या स्तुतीचा थोडा राग
पण आज आहे योग तर सांगते
तोंडओळख माझ्या असण्याची
मी कशी आहे शब्दात मांडते
खोटेपणाची मला फार चीड
सत्यवचन प्रत्येक शब्दाशब्दात
राग जरी असला कधी नाकावर
योग्य तेच रुचते नेहमी वाणीत
कुणास न दुखावता माझं जगणं
कुणाचं ऐकून नाही काही करणं
चुकीस स्वतःच्या असतं स्वीकारणं
कुणास कधीच नाही दोष देणं
मैत्रीवर सर्वात अधिक विश्वास
नाराजीचा कुणाचा असेल सूर
भावनांचा मनात उठतो कल्लोळ
सतत सलत राहते तीच हुरहूर
पुस्तकांची फार आवड मला
त्यांच्याशिवाय नाही विरंगुळा
लिखाणाचा छंद जोपासण्यात
साहित्यिक होण्याचा लळा
कुटुंब माझा अखेरचा श्वास
कुटुंबातल्या प्रत्येकाची लाडकी
जपते प्रत्येक नाते प्रेम नि स्नेहाने
हृदयात प्रत्येकासाठी आपुलकी
अधिकारी होण्याचं स्वप्न
मला सतत असतं खुणावत
नसेल मी जरी खरंच परिपूर्ण
गुंफले सर्वच माझ्या स्वप्नात
मी आहे तशी ही अशीच आहे
जी घाबरते स्वतःस दुखावण्यास
कुणाचं दुःख पाहता हळवं होतं मन
मग घाबरते दुसऱ्यास गमवण्यास
