STORYMIRROR

Savita Kale

Others

3  

Savita Kale

Others

मी आजची स्त्री

मी आजची स्त्री

1 min
241

त्रैलोक्याला पडते भारी

अशी दिव्य मी नारी

आस्तित्वाला नका ललकारू

मी आहे जग जिंकणारी।। १।। 


सावित्रीची लेक असे मी

जिजाऊंची वारस ही

वात्सल्याची मुर्ती अन्

हिरकणीचे धाडस ही।। २।। 


यम होई नत जिच्यापुढे

अशी पतिव्रता सावित्री मी

गरूडाची जिद्द घेऊनी

आकाश केले काबीज मी।। ३।। 


अन्यायाचा प्रतिकार नव्हे तर

करीन त्याची राख मी

घेतला मी ध्यास आता 

आणि डोळयात आग ही।। ४।। 


उत्सव एक दिनाचा नाही

वर्ष भराची राणी मी

बदलणार आता सारी

माझी जीवन कहाणी ही।। ५।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन