मी आहे मतदाता
मी आहे मतदाता
1 min
198
मी आहे मतदाता
मतदान करून
हक्क बजावणार
पसंतीच्याच उमेदवारास
मतदान करणार..
उमेदवार मोठे करोडपती
आम्ही ठरलो भिकारपती
मिळतात तर घ्यायच्या
पाचशे हजारच्या नोटा
प्रचार करायचा खोटा...
आताच तर अपल्यासनी
मोठा लाखमोलाचा भाव
मग् कोण विचारतोय राव
गल्लीत सुद्धा फिरकणार नाहीत
समस्या कधीच सुटणार नाही..
आम्हीही हुशार मतदाता
कुणाचे पक्के न आता
जो लक्ष्मीचा दानदाता
त्याच्या क्षणभर करू बाता
मग् अन्य पकड रस्ता
मी आहे मतदाता..
