STORYMIRROR

Sanjeev Borkar

Others

3  

Sanjeev Borkar

Others

महत्व श्रमाचे

महत्व श्रमाचे

1 min
327

श्रमाचे महत्व ! जाणून घेतले

कार्य सिद्ध झाले ! जगामधे !! 1 !!


चला सारे आता ! करुनिया काम

गाळूनिया घाम ! देशहीता !! 2 !!


रिकाम टेकडे ! बसून राहती

संसार भंगती ! श्रमाविना !! 3 !!


जसे जमेल ते ! करावेच श्रम

मिळेल व्यायाम ! शरीराला !! 4 !!


श्रमानेच झाली ! मनाचीही शुध्दी

सद्गुणांची वृध्दी ! मनामधे !! 5 !!


संत महात्म्यांना , श्रमाची तहान

झाले ते महान ! लोकांमधे !! 6 !!


जाणून घ्या रे ! श्रम हीच शक्ती

 पुण्याची ही भक्ती ! सर्व करा !! 7!!



Rate this content
Log in