STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

4  

Neha Ranalkar(Nawate)

Others

महिमा गुरुचा

महिमा गुरुचा

1 min
577

गुरुचा महिमा थोर जन्मता: 

मातापित्यांच्या रुपात लाभले!

जन्म ज्यांच्या मुळे जाहला

भरण पोषणास्तव जे राबले!!१


गुरु असे ब्रह्मा विष्णू होय गुरू

असे कैलासवासी गुरु महेश!

गुरु क्षमा अन प्रेम दाता

न करी निव्वळ उपदेश!!२


शिक्षक जेव्हा शाळेमध्ये

ज्ञानाचे दान करती!

ख-या अर्थाने तेही

विद्यार्थ्यांचे गुरूचअसती!!३


गुरू अंधारात दिपस्तंभ ते

वादळात जणू ‌नौका होती!

प्रपंचात राहून परमार्थ कराया

अध्यात्मिक गुरु लिलया शिकवती!!४


अनुभव प्रत्यक्ष असा गुरु

उघडे अंत:चक्षू छान!

निसर्गात ज्या येते प्रचिती

गुरू तोच रे जगी महान!!५


गुरु द्रोणाचार्यांना देई एकलव्य

गुरुदक्षिणा ती मागितल्यावरी!

आपुल्या उजव्या हाताचा अंगुठा

विद्याच परत काढून घेतली जरी!!६


गुरु आज्ञेनुसार शिष्य घडतो

सदाचारी अन् चारित्र्यवान!

गुरु शिष्य परंपरा गातसे गोडवे

त्या दोघांचे आदर्श व महिमान!!७


Rate this content
Log in