म्हातारपण
म्हातारपण
1 min
11.5K
म्हातारपणी केली
जीवनाची ही दशा
आजकालची पोरं
करून येती नशा
नशेत विसरून
स्वतःचे ते भान
आई बाबांचा ते
ठेवत नाही मान
नौकरी करे मोठी
पैसे कमावतो लयी
आई बाबांना मात्र
झोपवते खाली भुई
काही दिवसांनी मग
काढी तो घराबाहेर
हाकलून लावतात
हाच त्यांना आहेर?
शब्दांचे घाव त्यांना
देतो तो खूप मोठे
आजच्या मुलांपुढे
आई बाप झाले छोटे
आई बाबाने जन्म
दिला म्हणुनी बोलतो
म्हातारपणी का मग
हात असा तू सोडतो?
