"म्हातारपण"
"म्हातारपण"
1 min
412
आम्ही आहोंत जेष्ठ नागरिक
जीवनाची दोर झाली बारीक
नको आता आम्हाला बदाम खारीक
पेन्शनची सांगा केव्हा आहे तारीख
सकाळी थोडं फिरून येवू
वेळेवर घाला आम्हाला जेवू
बीपी, शुगर वेळेवर तपासू
त्यासाठी डॉक्टरांचे उंबरे घासू
नातवंडे आहेत आमचा जीव
आमच्या आनंदाची ती सुंदर ठेव
सतत आम्ही त्यांचे लाड पुरवू
आमच्याकडे आहे त्यांच्यासाठी खाऊ
एके दिवशी आम्हाला जावे लागणार
माहित नाही तो दिवस कधी येणार
जास्त दिवस तुम्हाला त्रास नाही देणार
आमचा आशीर्वाद तुम्हाला सदाच असणार
