STORYMIRROR

शिल्पा म. वाघमारे

Others

3  

शिल्पा म. वाघमारे

Others

महाराष्ट्राची संस्कृती

महाराष्ट्राची संस्कृती

1 min
371

मायभूमी या महाराष्ट्राला


शोभती अखंड किर्तीतोरणे


धमन्यांतील रुधिरास चेतवी


नित्य कर्तव्याची स्फुरणे...१


ज्ञान उगम नि तपोभुमी ही


ही तर संगम दिव्यत्वाचा


शिवसिंहाचा छावा शंभू


नि शिवा मर्दानी जिजाऊंचा...२




रांगडी मराठी शान आमुची


अभिमान असे महाराष्ट्राचा


अमृतासह जिंके पैज जी


ठेवा ती अनुपम माधुर्याचा... ३




सुसंस्कारे त्या आम्ही भारलो


साक्षी नभीचे दुधी चांदणे


सूर आमुचे जरी निराळे


गाऊ एकच मंजुळ गाणे... ४




धर्म,भाषा आणि जाती


पुसू नका येथे कोणा


चराचरांशी कृतज्ञतेचे,


माणुसकीचे जपतो नाते... ५




जागूनी वाचनास सदा


थोर वारसा युगे चालवू


जयगीत गाऊया महाराष्ट्राचे


स्वर 'तार' सप्तकात चढवू... ६




'अरबी' लाटांची गाज सदोदित


गातसे पोवाडा मन्मातेचा


सह्यगिरीचा शिखर 'कळसु'


अभिमान मिरवी काळ्या मातीचा..





चैतन्य झळाळी अशी जणू


साकारावी 'अमृतमंथनी'


तेवत ठेवू प्रज्ज्वल ज्योती


आस प्रदिप्त हिच मनी... ८




मान वाढवू महाराष्ट्राचा


चला आज या विश्वांगणी


वाकून मुजरा माझा तिजला


सर्वस्वच अर्पिते चरणी... ९




शाश्वत आदर्शांचे हे लेणे


रोमारोमांमध्ये सदैव भिनवू


हवा असे जर पुन्हा 'शिवाजी'


'जिजाऊ'च ती आधी घडवू... १०


Rate this content
Log in