महाराष्ट्राची संस्कृती !!
महाराष्ट्राची संस्कृती !!
1 min
367
महाराष्ट्राची संस्कृती !!
विशाल. व समृध्द आहे
महाराष्ट्राची संस्कृती
संत महंतांची आहे त्यात
अनमोल महती
ज्यांनी सदैव दिली
सदाचाराची शिकवण
वर्ण, धर्म भेद मोडून केली
समतेची भलामण
महाराष्ट्राच्या संस्कृतीत आहे
श्रध्देला महत्त्व
आठवड्याचा प्रत्येक वार
ठरला आहे देवांचा
वेगळेपण जपले आहे
प्रत्येक सणा वाराचे
पोषाखातूनही दर्शन होते
रिती रिवाजांचे
संगीताची ही परंपरा आहे
विशीष्ठ वेगळी
आदर राखला जातो
येथे प्रत्येक धर्माचा
माणूसकी जपली जाते
येथे मना मनातुन
संस्कृतीचा अभिमान आहे
ह्रृदया ह्रृदयांतून
