मेणबत्तीचे गर्वहरण
मेणबत्तीचे गर्वहरण
1 min
132
एका गृहस्थाने मित्रांना
मेजवानीसाठी बोलावले
मोठ्या मेणबत्तीच्या प्रकाशात
जेवायला बसवले
मेणबत्तीला स्वतःचा
अभिमान वाटला
म्हणे आपल्या प्रकाशाचा
केवढा उपयोग झाला!
चंद्रसूर्यही माझ्यापुढे फिके
असे म्हणत ती गर्वाने फुगली
हे ऐकताच
जेवणारी मंडळी खुदकन हसली
एक गृहस्थ म्हणाला,
चंद्र-सूर्याला क्षुद्र समजतेस
त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असल्याची
मिजास दाखवतेस
खिडकी उघडताच
मेणबत्ती विझली
तिचे गर्वहरण होऊन
तिला तिची चूक कळली
