मेळा वैष्णवांचा
मेळा वैष्णवांचा
1 min
86
छत्र धरूनिया थाटात निघाली
ज्ञानोबा माऊली पंढरीशी!!१!!
मृदंगाचा ध्वनी अंबरी गर्जत,
विठ्ठल नामात दंग होई!!२!!
रामकृष्ण हरि बोल मुखावरी
गर्जती भुवरी वारकरी!!३!!
ज्ञानोबा तुकोबा सोपान मुक्ताई
विठ्ठल रुख्माई भेटी जाती!!४!!
संतदास म्हणे आनंदी सोहळा
फुटतसे पोळा वैष्णवांचा!!५!!
