STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

मेहंदी.....

मेहंदी.....

1 min
484

लालचुटूक मेहंदी हातावरची

दिसते कितीतरी छान

पाहतच राहावे वाटते

हरपून जाते हो भान......


सणावाराला लावतो मेहंदी

लग्नात हात मेहंदीने सजती

नभांगणातील सूर्याप्रमाणे

रंगछटांमधे नारंगी,लाल भासती...


गोबर्‍या हाताची वाढवते शान

ही लाल,लालचुटूक मेहंदी

मुली, बायकाची आवडती ही

होती सदा हो आनंदी....


आत्ताची आहे फॅशन हो ही

पण ही तर परंपरा भारताची

कथा आहे मेहंदीची हो

पणजीच्याही आधीच्या युगाची....


हळद लागताच मेहंदीला

मेहंदीचा रंग लयी भारी खुलला

नवरी चालली सासुराला

माहेरी आश्रूंचा पूर आला.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन