STORYMIRROR

Dipali patil

Others

4  

Dipali patil

Others

मेघ बरसला

मेघ बरसला

1 min
22.9K


आगमनाने पावसाच्या 

ओसंडून मेघ बरसेल 

थेंब थेंब ओंजळ भरेल 

सृष्टीत रम्य सुरताल घुमतील 


पल्लवीत होईल शिवार 

सरीवर सरी चिंब त्रिवार 

आला आला वर्षाकाल 

डुलतील मळे,वृक्षवेली सभोवार


ढगांची पळापळ आसमंतात 

बेधुंद दरवळ हलकी मृदेची 

सांजचा पर्जन्यवारा सोसाट्याचा 

सैरावैराकरी मांडणीजीवनचक्राची


व्याकुळ होता बळीराजा

श्रमला प्रार्थना करून 

 नको रे पाहून ढगाआडून 

घेणा आता जरा बरसून 


विसरून विरहाचा तो वैशाख 

अवचित यावा श्रावन आनंदाचा 

भाव भावना जाणून नात्याच्या 

जल्लोषात आनंद घेऊ जीवनाचा  


Rate this content
Log in