मधुमालती
मधुमालती
1 min
577
मधुमालती
लाल पांढरा गुच्छ
वेलीवरती
मज खुणावे
लाल मधू लाजून
ती डोकावून
हिरव्या कंच
वेलीतून जन्मली
गुलाबी लाली
पाढंरी शुभ्रा
मधुमालतीची ही
कहाणी काही
बोल घेवडी
लाल मधू,अबोल
शुभ्रा हि वेडी
सुंदर गुच्छ
मधुमालतीचा हा
वेलीस पहा
सजवीतसे
कमाणी वेलीतूनी
अंगणी असे
सौंदर्याचा हा
मधुमालती मेळ
निसर्ग खेळ
रंगात न्हाती
शुभ्रा गुलाबी लाल
मधुमालती
