STORYMIRROR

Vasudeo Gumatkar

Others

4  

Vasudeo Gumatkar

Others

मौसमी वारे

मौसमी वारे

1 min
520


मौसमी वारे आता

जरा बदलत आहे

चिन्ह पावसाचे

दिसू लागले आहे


कधीकधी हवा

जोरात वाहत आहे

कानाकोपऱ्यात नभाच्या

विजा चमकत आहे


घेऊन चाहूल त्याची

कामे आता चालली

पाऊस येण्याअगोदर

शेतीची मशागत चालली


जोमात चालली बघा

नांगरणी, वखरणी

काडी कचरा वेचत

नीट होत आहे जमिनी


घाई दिसते आता

सर्वत्र पेरणीची

कधीही येईल तो

वाट पाहतो पावसाची



साहित्याला गुण द्या
लॉग इन