STORYMIRROR

Sushama Gangulwar

Others

3  

Sushama Gangulwar

Others

मैत्रीण

मैत्रीण

1 min
328

मैत्री जगावेगळी आणि 

एक प्रेमळ नातं आहे 

जिथे क्षणोक्षणी दोघांचाही 

सुख दुःखात साथ आहे......


दोघेही जपूया मैत्री आपली 

आपण अगदी जिवापाड 

कधी चुकून ही होऊ नकोस 

तू माझ्या नजरे आड.......


तुझ्या समोरच तर सखी मी 

खोलू शकते मनातले भेद 

आयुष्यात मला गेलीस सोडून 

तर मला खूपच होईल गं खेद.....


तुझ्या माझ्या मैत्रीत सदैव 

राहावे निस्वार्थ प्रेमाचा गंध 

तुझी माझी मैत्री म्हणजे सखी 

एक विश्वास रुपी रेशमी बंध.....


नको मैत्रीत आपल्या 

कुठलाच अहंम भाव 

दोघांच्या सुंदर मैत्रीचा 

काढावे सगळ्यांनी नाव......


तू रहावी जीवनात सदैव 

मी ईश्वराला करते प्रार्थना 

तुझ्या विना खर सांगू 

माझ्या जीवनाला काही अर्थ ना.....


Rate this content
Log in