STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Others

3  

Nurjahan Shaikh

Others

मैत्रीचा धागा

मैत्रीचा धागा

1 min
220

नाजुक बंधन बांधले 

मैत्री ने बंध रेशमाचे, 

सुख-दुःखात साथ देण्यास 

अधीरलेल्या मनाचे.


कितीही आले अडथळे 

पक्का धागा मैत्रीचा 

अधिक मजबूत होईल 

संकटात टिकेल खात्रीचा


विणलेली गुंफण मैत्रीची 

कधीही अलगद न सुटणारी, 

अनेक जिवांच्या विचारांची 

मैत्री फुलेल न तुटणारी.


Rate this content
Log in