मैत्री
मैत्री
1 min
368
शब्द तिचे माझे थोडे
जीवन खेळामध्ये आले
आमच्या या नात्याला
मैत्रीचे नवे अर्थ मिळाले
ओळख होती नवीन काही
जुन्यासारखं वाटायचे
अडचणीच्या वेळी आम्ही
दुःखात सोबत असायचे
आठवणीसाठी विसरावे
यात असे काही नसते
रक्ताच्या नात्याहुनी मैत्री
एक प्रेमळ नाते असते...
