मैत्री
मैत्री
तुझी माझी मैत्री
माझे जीवन आहे
आपली मैत्री
चिरंतर आहे
🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻
तू आहेस म्हणून
मी उभा आहे
पाठीवर सदैव
तुझाच हात आहे
👫🏻👫🏻👫🏻👫🏻👫🏻👫🏻👫🏻👫🏻👫🏻
तू म्हणजे माझ्या
आयुष्यातील वाहणारा झरा
रणरणत्या जीवनात
तुझाच आधार खरा
🚿🚿🚿🚿🚿🚿🚿🚿🚿
तू म्हणजे बाहेरून काटेरी
आतून गोड गरा
माझ्या जीवनाचा तूच
मार्गदर्शक खरा
👩🏻🏫👩🏻🏫👩🏻🏫👩🏻🏫👩🏻🏫👩🏻🏫👩🏻🏫👩🏻🏫👩🏻🏫
तुझ्या मैत्रीमुळे जीवनाला
मिळाला अर्थ नवा
प्रत्येक क्षणात
सोबत तूच हवा
👫🏻👫🏻👫🏻👫🏻👫🏻👫🏻👫🏻👫🏻👫🏻
आपल्या मैत्रीचा लोकांना
नेहमीच वाटे हेवा
आपली मैत्री म्हणजे
आयुष्याचा गोडवा
🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
या प्रवासात हात
कधी तू सोडू नकोस
काही झाले तरी
मैत्री आपली तोडू नकोस
🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻
तुझ्या मैत्री शिवाय
सारे व्यर्थ आहे
तुझ्याशिवाय माझ्या
जगण्याला काय अर्थ आहे
