मैत्री
मैत्री

1 min

12K
बुकावराच्या शब्दांचा
सुटसुटीतपणा म्हणजेच सर्व काही नसतं,
त्याच्या शेवटच्या पानावरती..
रंगीबेरंगी पेनाने कीचाडलेल्या अक्षरातही
व्यक्त न होणाऱ्या मनातल्या
बऱ्याचश्या भावना लपलेल्या असतात..
तशाच भावनांनी जपुन आलेली व्यक्ती
हि कळत नकळत
मित्र म्हणुन नेहमीच
आठवणींना चिकटलेला असतो..
कोणी सोबत असतो,
कोणी दुर असतो
तर कोणी दुर असुनही सोबत असतो..
सर्वांच्या आयुष्यातला
यारी दोस्तीतल्या भावना मात्र एकच..
ती म्हणजे"मैत्री"
त्याच मैत्रीच्या भावनांना जपावी ती "मैत्री"