मैत्री
मैत्री
1 min
153
मैत्रीचे नाते
विचारांचे गुंफन
मने जोडते
रक्ताचे नाते
फिके पडते जिथे
मैत्री धावते
भेटता मित्र
भावनांचा फुटतो
बांध सर्वत्र
खेळात खेळ
भांडणे नसंपणारी
अजोड मेळ
मनमानीची
अतुट विश्र्वासास
जोड मैत्रीची
अबोल नाते
न बोलता समजे
सारे काहि ते
दूरवरून
आनंदाने सजवी
जी आठवन
ह्दयावरती
रेखाटून मैत्रीचे
तैलचित्रे ती
सदा जपावी
आजिवन जपावी
शब्द गोडवी
