STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

2  

Meenakshi Kilawat

Others

मैत्री

मैत्री

1 min
162

मैत्री असावी पाण्यासारखी

निर्झर निर्मळ स्फटीकरूपी

जशी हिरवळ बहरावी

अन् आत अत्तराची कुपी!!


प्रेमाची फुले मनामनांतून 

उधळी जीवन लाटांवरी

समृद्ध असो वा दरीद्रहारी

मित्र सखा कृष्णापरी!!


मित्र मिळतो भाग्याने 

असावा तो गुणसंपन्न 

अभिजात भाष्याने भरी रंग 

हास्याने जीवन होई प्रसन्न !! 


सुखाच्या श्रावण सरींसारखी

निर्व्याज प्रेमळ देई माया

धावुनी संकटात दु:खावर

करतो शीतल मैत्रीची छाया!!


स्नेह मैत्रीचा जगी आहे

अमूल्य ख्याती परोपरी

मैत्री जागणारा अमोघ झरा 

राज्य करीतो काळजावरी!!


हाकेसरशी तगमग होई

जाणीव मैत्रीची क्षणोक्षणी

अखंड त्रिभुवनात नाही

मित्रनाते जगात दुसरे कोणी!!


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை