STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

4  

Sanjay Raghunath Sonawane

Others

मैत्री- कविता

मैत्री- कविता

1 min
27.4K


एकांताच्या सोबतीला मित्रा तूच हाय

दुःखाच्या या जगामधी तूच माझी माय

स्वार्थाच्या दुनियेमधी माझे कुणी नाय।

आठवणीने कधी, कधी रडतो ढाय ढाय

उरले नाही कुणी मला तुच एक हाय


उन सावलीत तूच माझी माया

उरलेल्या आयुष्याला तूच माझी छाया

दुःखाच्या जगामधी मन मोकळ केलय

एकांताच्या सोबतीला मित्रा तूच हाय


फुलासारखे जीवन आठवणीने भरतय

माझे ह्रदय आनंदाने फुलून छान जातय

क्षणभंगूर विचाराना थारा देत नसतय

एकांताच्या सोबतीला मित्रा तूच हाय


आठवणीचा सागर तू भरलेला हाय

तुझ्याशिवाय जगणे हे अधूरेच रहाय

तुझ्यामुळे जगण्याला अर्थ नवा हाय

एकांताच्या सोबतीला मित्रा तूच हाय


विश्वासाने भरलेले महान जग उरलय

मानवतेच्या धर्माला आदराने जपतय

हिम्मत जगण्याला तुझ्यामुळे हाय

एकांताच्या सोबतीला मित्रा तूच हाय


Rate this content
Log in