STORYMIRROR

Shila Ambhure

Others

4  

Shila Ambhure

Others

मायेचा गुणठेवा

मायेचा गुणठेवा

1 min
264

सासुराशी

लेक जाय

तिला गुज

बोले माय


"जीभेवर

ठेव गोडी

साखरेची

ज्यादा, थोडी"


"आपसूक

थोर सान

ठेवतील

तुझा मान"


"एकरूप

हो गं असे

अन्नामध्ये

मीठ जसे"


"तुरटी गं

जशी जळी

बसवते 

गाळ तळी"


"तू ही ठेव

तैसा भाव

राग, द्वेष

नको ठाव"


"नांद अशी

मेथीवानी

फुले जसा

मळा रानी"


"परी एक

खास बात

सांगते गं 

मी कानात"


"प्रसंग घे

पारखून

बघ जरा

निरखून"


"कारल्याचा

कडू गुण

ठेव बाई

तो जपून"


"अनुभवी

माझे बोल

जाण बाई

त्यांचे मोल"


साहित्याला गुण द्या
लॉग इन